Ad will apear here
Next
कोकणातील ‘टॅलेंट’ झळकले; नऊ जणींची कॉग्निझंट, इन्फोसिसमध्ये निवड
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयातील विद्यार्थिनी
कॉग्निझंट व इन्फोसिस कंपन्यांमध्ये निवड झालेल्या शिरगाव येथील महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींसह प्र. प्राचार्य, प्राध्यापक.

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नऊ मुलींची कॉग्निझंट आणि इन्फोसिस या नामवंत आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. बीसीए कॉलेजसह पुणे येथील के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने या कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.

शिरगाव कॉलेजमधील ‘टीवायबीसीए’च्या विद्यार्थिनींची आयटी कंपन्यांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे. मागील दहा वर्षांपासून बीसीए कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंट विभागांर्तगत विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट, टीसीएस, अॅयटॉस, पटनी आदी मल्टिनॅशनल आयटी कंपन्यांच्या इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते.

यंदा इन्फोसिस कंपनीमध्ये केतकी कार्किडे, पूर्वा मडगावकर, यशश्री मयेकर, दिव्या चव्हाण यांची निवड झाली. कॉग्निझंट कंपनीमध्ये प्राची घाडी, वैष्णवी राऊत, पूर्वा मडगावकर, हिंदवी खडपकर, काजल भालवलकर, यशश्री मयेकर, केतकी कार्किडे या विद्यार्थिनींची निवड झाली. अॅप्टिट्यूट, टेक्निकल अँड एचआर परीक्षांमधून या विद्यार्थिनींची निवड झाली. यासाठी लागणारी सर्व तयारी महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून करून घेतली होती. 

आतापर्यंत येथून बीसीए होऊन अनेक विद्यार्थिनी आयटी क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत. या वर्षी अजूनही काही नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येणार आहे. या यशस्वी विद्यार्थिनींना बीसीए प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे को-ऑर्डिनेटर प्रा. अरबाजखान फडनाईक यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बीसीए स्थानीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश सोहोनी, पदाधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWSCH
Similar Posts
नर्सिंग कौशल्याद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे रत्नागिरी : ‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
‘स्त्रियांनी कौशल्ये शिकून किमान चौघींना नोकरी द्यावी’ रत्नागिरी : ‘स्त्री सुसंस्कृत असेल, तर तिच्यामुळे मुले व घर सुधारते. त्यामुळे स्त्रीने व्यवसाय केला, तर सारे कुटुंबही या व्यवसायात मदत करते. बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थिनी, गृहिणी, मुली शिकल्यानंतर त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू करून किमान चार जणींना नोकरी द्यावी. म्हणजे या केंद्राचा उद्देश सफल होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language